सोंग
आता काय करणार आहात बसून तुमी घरात तुमी स्वतःच उभे आहात आता कोरोनाच्या दारात बाहेर फिरून कोरोना येतो ही आंधश्रद्धा ठरली चालता फिरता न येणारी म्हातारी कोरोनान घरातच धरली सरकार म्हणते आमाले असे बाहेर नका जाऊ फिरत यांचं निवडणूक असलं कि नियमाचं पालन हेच नाही करत सांगा आता अस्यान कोरोना दूर होईल का मागील वर्ष्या प्रमाणे जनता वर्ष्यानु वर्ष घरातच बसून राहील का नुसता बसून राहल्याने जर कोरोना गेला असता तर नव्या नवरी वाणी तो परत कधीच आला नसता किती वेळा कराल आता हे लोकडाऊन आता तर जनतेचे पण झाले खिसे डाऊन असे आता तुमी किती काळ वागणार आणि गरीब या काळात असा किती वेळ जगणार घरात बसून असा कोरोना काही हरणार नाही जर टोचली लस सर्वाना तर तर कोरोना कधीच काही करणार नाही.......... *=कवी =* सुरेश पिवळतकर 7030532030 *visit*=kalakarteam.blogspot.com