देश हा
प्रतीक आमी विश्वशांतीचे
=कवी=
सुरेश पिवळतकार
मो. नं. 7030532030
Email=sureshpivaltkar892@gmail.com
झालेल्या त्या थोर क्रांतीचे
शिकवण आम्हा गुरुवाणीचे
संगीत हे एका सुरवाणीचे
बघा सूर्य हा पुंन्हा उगवला
पहा देश हा कसा जागवला...... !1!
ध्येयास जेव्हा क्रांती आली
वीर मनू ती वीरांगना झाली
नवीन स्वातंत्र्याची तेव्हा आली चळवळ
त्या इंग्रजांची तेव्हा झाली खळबळ
वई तेविसाव्या ती गेली वीरगतीला
स्वातंत्र्यासाठी लढावे हे शिकवले या देश्याच्या मातीला
दीप ज्योत हा तिमिर उजवला
पहा देश हा कसा जगवला.... ..
शत्रूच्या मनामध्ये ज्याची भीती प्रखर
वीर होते ते पंडित चंद्र शेखर
एक मात्र नेता त्या त दांडीचा
आदर्श ठेवला आम्ही तो महात्मा गांधींचा
स्वातंत्र्याचा नारा हाच एक सजविला
पहा देश हा कसा जगवला.........
खेळला होळी जो लाल रंगाची
ख्याती न्यारीच भगत सिंगाची
प्रेमापोटी देशाच्या इंग्रजांशी भिडला
स्वातंत्र्यासाठी देशाच्या चक्क फासावरती चढला
क्रांतीसाठी थोर नारा पुन्हा एकदा गाजवला
या थोर हुतात्म्यांनी बघा देश हो आमचा असा जागवला....
=कवी=
सुरेश पिवळतकार
मो. नं. 7030532030
Email=sureshpivaltkar892@gmail.com
Comments
Post a Comment