मावा बाप
हि एक वऱ्हाडी कविता आहे
उभा मंडप अफाट त्याले एकाची आसरा
कास्ट लेउनी अंगाले तरी चेहरा हासरा
त्याच्या कास्टची कहाणी कुणी लिहली का कधी
त्याच्या अंगावरच्या घामाने उभी वाहिली कि नदी
त्याच्या मेहनतीने लगे या त धरणीलेही धाप
काय सांगू त्याची कथा कसा आहे मावा बाप
साऱ्या संसाराचे ओझे त्याच्या पाठीवर लादे
आम्हा नेसवनी नवीन त्याचे राहणीमान सादे
तो त रडतो बिचारा पर असृ त्याचे नाही दिसत
एवढे करून कबाळ तरी नाही कुणी त्याला पुसत
आमच्या सुखासाठी केले त्यानं सगळेच पाप
काय सांगू त्याची कथा कसा आहे मावा बाप....
मशाल घेऊन दरिद्रीची जाळाली आयुष्याची वात
आमच्या साठी जोडलं ज्यानं चक्क अंधाराशी नातं
कशी जपतो तो नाती या म्हाताऱ्या वयात
काडले कर्ज आम्हा साठी त्यानं त हयात
जगात उपकारच त्याच्या नाही कुठं मापं
काय सांगू त्याची कथा कसा आहे मावा बाप....
हाती घेऊनि गोंपीला
त्यानं संसार जुंपीला
आई संस्कृती चा सुधार
तो त घराचा आधार
नाही घेत सुटी कधी असता अंगालाही ताप
काय सांगू त्याची कथा असा आहे मावा बाप .........
Comments
Post a Comment