Posts

Showing posts from November, 2020

कट्यार काळजात घुसली

 स्वर जीवनाला मी दिला संगीताची करुनी रचना गीत तू केला मी नुसताच प्रश्न्नसंच प्रश्नांचा मज गमे तूच खंड त्या उत्तरांचा तू इंद्रपरीची अप्सरा जणू चेक्स डोळ्यातील चमके सम भानू पहावया तुझं मी हाच ध्यास कोराव यमराज्याच्या जाता सदणी  तुझाच नाम जोरावा इच्छा ही माझी कळेना तुजला तू मयुरी अन मी मयूर सजला आयु प्रेमामध्ये छाया तुझीच दिसली बघातास तुझ्या सौन्दर्यास कट्यार ही काळजाच्या आरपार घुसली..... सुरेश पिवळतकार 7030532030

मावा बाप

 हि एक वऱ्हाडी कविता आहे  उभा मंडप अफाट त्याले एकाची आसरा  कास्ट लेउनी अंगाले तरी चेहरा हासरा  त्याच्या कास्टची कहाणी कुणी लिहली का कधी  त्याच्या अंगावरच्या घामाने उभी वाहिली कि नदी  त्याच्या मेहनतीने लगे या त धरणीलेही धाप  काय सांगू त्याची कथा कसा आहे मावा बाप  साऱ्या संसाराचे ओझे त्याच्या पाठीवर लादे  आम्हा नेसवनी नवीन त्याचे राहणीमान सादे  तो त रडतो बिचारा पर असृ त्याचे नाही दिसत  एवढे करून  कबाळ तरी नाही कुणी त्याला पुसत  आमच्या सुखासाठी केले त्यानं सगळेच पाप  काय सांगू त्याची कथा कसा आहे मावा  बाप....  मशाल घेऊन दरिद्रीची जाळाली आयुष्याची वात  आमच्या साठी जोडलं ज्यानं चक्क अंधाराशी नातं  कशी जपतो तो नाती या म्हाताऱ्या वयात  काडले कर्ज आम्हा साठी त्यानं त हयात  जगात उपकारच त्याच्या नाही कुठं मापं  काय  सांगू त्याची कथा कसा  आहे मावा बाप....  हाती घेऊनि गोंपीला  त्यानं संसार जुंपीला  आई संस्कृती चा सुधार  तो त घराचा आधार  नाही घेत सुटी कधी असता अ...