Posts

Showing posts from February, 2021

भरकटलेल जिवन

 अडकणीच्या कड्याला सांजवाटिचा पार आयुष्य माझ्या वाटणीला पहा कमी फार उरलेलं आयुष्य जगायचं का त्याच दुःख कराव सहन मिळत बघा मातिमध्ये  कस हे भरकटलेलं जिवन विश्रामची प्रक्रिया आहे किती शीघ्र आयुष्य कसे जगलो जणू शिकारी त्याचा व्याघ्र आयुष्य भर  केले नुसता विचारांचे वहन मिळत बघा मातिमध्ये कस हे  भरकटलेलं जिवन प्राण वेचून प्राण सोडीतो कसला हा ध्यास त्रिकोणा प्रमाणे निघतो का जीवनाचा व्यास मातीने दिलेले आयुष्य शेवटी मातीच करते ग्रहण मिळते बघा मातीमध्ये हे भरकटलेलं जिवन सुरेश पिवळतकर 7030532030