माझी मराठी
माझी मराठीच शिकवते जगायला माझी मराठीच शिकवते हसायला माझी मराठी म्हणजे छंद माझी मराठी म्हणजे नव्याने आलेला मातीला सुगंध माझी मराठी म्हणजे अक्षरे स्पष्ट माझी मराठी म्हणजे मायेची ममता अन बापाने केलेले कबाळ -कष्ट माझी मराठी म्हणजे थंडा त्यापुढे इंद्राचाही स्वर्ग माझी मराठी म्हणजे नदी- खोरेआणि आहे दरवाळलेला त्यात निसर्ग माझी मराठी म्हटलं तर चमचमतो रवी माझी मराठी म्हणजे माझ्या आया बहिणींनी गायलेली जात्यावरची ती ओवी माझी मराठी म्हणजे संस्कृतीचा घडा माझी मराठीच लावते भल्या- भल्याना आपुलकीचा रडा माझ्या मराठी भाषेची कुणी करू नका खोडी कारण माझ्या मराठी भासेला नाही जगात कुठं जोडी माझ्या मराठी भासेला नाही जगात कुठं जोडी सुरेश पिवळतकर 7030532030