अंत
सहज माझ्या काळजाशी मी विचारले जेव्हा जगणं खूप सुंदर आहे उत्तर मिळाले तेव्हा साहजिकच काळजाची एक हुंदकाळी भरतांना हा प्रश्न मला पडला केवळ मरतांना जेव्हा आंतरआत्मा धुळीत लपला तेव्हा मांसामद्ये माणूस जपला जेव्हा घराबाहेर माज होते काढत ठोके माझ्या काळजाचे होते वाढत तीच माझी अखेरची आंघोळ करताना हा प्रश्न मला पडला केवळ मारताना वस्राची नेसवनी मज नवीन केली उचलायला मज चार चौघेही आली खांदे देणारे मज उचलायला लागले अचानकच तेव्हा माझ्यातील माणूसपण जागले लोक दिसली मला माझी निंदा करतांना हा प्रश्न मला पडला केवळ मरतांना त्या अखेरच्या टप्प्यात नेऊन मज ठेवले होते डोळे माझे उघडे पण शरीर मात्र थकले होते माझे सर्वस्व माझ्यापासून दूर जात असता काही डोळ्यात दिसलें अश्रू अन काही मज बगत होती नुसता हेच माझे भाग्य होते चितेवर जळताना हा प्रश्न मला पडला केवळ मरतांना कवी =सुरेश पिवळतकर